*करकंब - मोडनिंब रस्त्याच्या कामाची कार्यकारी अभियंत्यांनी केली पाहणी* *- *मागील कामाची दुरुस्ती होईपर्यंत पुढील काम बंद ठेवण्याच्या सूचना*
करकंब/ प्रतिनिधी :-
करकंब - मोडनिंब रस्त्याचे काम करकंब येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया अंतर्गत सुरू होते.हे काम घेतलेला ठेकदार हा मनमानी व निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम "दै दामाजी एक्सप्रेस ने" प्रसिद्ध केले होते.तसेच या वृत्ताची दखल घेऊन आ.प्रशांत परिचारक यांनीही सदर ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या.त्यानंतर या रस्त्याच्या कामाची पाहणी पंढरपूर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांनी केली असुन निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा होईपर्यंत पुढील काम थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
येथील रस्त्याचे काम ठेकेदार डांबराचा थातुरमातुर थर देऊन निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचे समोर आले होते.हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर विविध माध्यमांनी यावर आवाज उठवला होता.निकृष्ट काम पुन्हा ठेकेदाराला चांगल्या प्रतीचे करावे लागणार आहे आणि त्यानंतरच उर्वरित काम उत्तम प्रतीचे होणार का हे पहावे लागणार आहे.
या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 55 लाख रुपये एवढा निधी खर्च होणार आहे.परंतु हा रस्ता करीत असताना ठेकेदार डांबराचा कमी प्रमाणात वापर करीत असल्याने काम निकृष्ट होत असल्याचे समोर आले होते.पुढे काम सुरू असताना पाठीमागे रस्त्यावरील खडी उघडलेली होती.मोठी खडी टाकण्या अगोदर डांबर स्प्रे घेणे गरजेचे असताना ठेकेदार मात्र थातुरमातुर डांबर टाकून त्यावर खडी अंथरून हा रस्ता निकृष्ट करीत होता.त्यामुळे झालेले निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा करण्याच्या सूचना पंढरपूर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम.गावडे यांनी दिल्या आहेत.
कोट :-
करकंब - मोडनिंब रस्त्याच्या कामाची पाहणी केली असून केलेल्या कामातील खराब झालेले काम संबंधित ठेकेदाराला पुन्हा करावयास सांगितले असून तोपर्यंत पुढील काम बंद ठेवण्यात आले आहे.
- डी. एम.गावडे
(कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग,पंढरपूर)
चौकट :-
करकंब - मोडनिंब रस्त्यासाठी एक कोटी 56 लाख रु.निधी असून हा रस्ता चांगल्या प्रतीचा बनविला पाहिजे व निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा व उर्वरित काम उत्तम प्रतीचे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.