*राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे वतीने आ. रोहित पवार यांचे स्वागत*
पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पंढरपूर तालुका पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमय बैठकीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार तसेच पंढरपूर मतदार संघाचे प्रभारी आ.रोहितदादा पवार हे उपस्थित राहून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय साठे, जिल्हा सचिव मा . जयसिंग मस्के,जिल्हा उपाध्यक्ष मा .नवनाथ कांबळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष मा .अमोल हिरालाल खिलारे ,कार्याध्यक्ष मा .संजय वाघमारे व तालुका उपाध्यक्ष मा . वैभव रणदिवे यांनी आमदार रोहित दादा पवार यांना कार्य अहवाल सादर केला यावेळी मंचकावर उपस्थित उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. नागेश दादा फाटे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लाडके नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. भगीरथ दादा भालके,सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणरावजी काळे,जिल्हा उपाध्यक्ष युवराज दादा पाटील , युवकचे जिल्हाध्यक्ष गणेशजी पाटील , तालुका अध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख , शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते .