*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या उपस्थितीत पदे जाहीर* *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उदयोग व व्यापार विभागाच्या जिल्ह्यातील झाल्या निवडी* 

*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या उपस्थितीत पदे जाहीर*  *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उदयोग व व्यापार विभागाच्या जिल्ह्यातील झाल्या निवडी* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

माढा तालुक्यातील  टेंभुर्णी येथे  रविवारी विविध नेत्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

यावेळी   उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हा महिलाध्यक्ष सौ.प्रमोदिनीताई सुहास लांडगे यांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पद नियुक्ती समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे , सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,कार्यक्रम अध्यक्ष संजयबाबा कोकाटे,शिवतेजसिंह मोहिते पाटील (माजी सरपंच अकलूज ग्रामपंचायत), सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रामदादा म्हस्के, उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हाध्यक्ष मयुर काळे, विभाग जिल्हा उपाध्यक्ष अण्णा नागटिळक, सागर पडवळ (सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष), औदुंबर महाडिक (माढा तालुका अध्यक्ष), बाळासाहेब पाटील (माढा तालुका कार्याध्यक्ष),  विलासराव देशमुख (जेष्ठ मार्गदर्शक),  दत्ताजी गवळी (कुर्डूवाडी शहर अध्यक्ष, आदी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते .

  यावेळी निवड करण्यात आलेल्यामध्ये सौ.उज्वलाताई संभाजी साळुंखे(सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), सौ.सविताताई प्रदिप गोडगे(करमाळा तालुकाध्यक्ष), सौ.पूजाताई रणजीत भंडारे (सोलापूर जिल्हा सचिव), सौ.रेखाताई महादेव कसबे (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), सौ.सिमाताई संतोष राऊत (माढा तालुका सचिव), सौ.वनिताताई रविंद्र वजाळे (सोलापूर जिल्हा संघटक), सौ.रेश्माताई नितीन आडगळे (माढा तालुका सरचिटणीस), सौ.लक्ष्मीताई गुरुदेव शिंदे (माढा तालुका सरचिटणीस), 
सौ.सारिकाताई अंबादास सलगर (मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष), सौ.राणूबाई आप्पा शिवणे (करमाळा तालुका संघटक), सौ.फातीमा जब्बर शेख (करमाळा तालुका कार्याध्यक्ष), सौ.वनिताताई भीमराव बागल (सोलापूर जिल्हा सरचिटणीस), सौ.वर्षाताई सुजय काळे (करमाळा तालुका उपाध्यक्ष), सौ.आम्रपाली आण्णा सरवदे (माढा तालुका संघटक), श्री.तेजस दत्तात्रय बोबडे ( सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), श्री.धनंजय श्रीपतराव देशमुख (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), श्री.तुषार साहेबराव बारबीले (माढा तालुका उपाध्यक्ष), श्री.दिपक बळीराम बनसोडे (पंढरपूर तालुका अध्यक्ष) या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे . 

 पद नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या , या पदाधिकारी यांनी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल हा ठाम विश्वास व्यक्त केला.