*विठ्ठल -रुक्मिणीचे पददर्शन सुरू करा, प्रासादिक वस्तुंना परवानगी द्या* *या मागणीसाठी जिल्हाधिकारी, आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांच्याकडे सर्वपक्षीय नेत्याचे निवेदन** अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा *

पंढरपूर/प्रतिनिधी

श्री विठ्ठल रुक्मिणी चे पदस्पर्श दर्शन सुरू करावे आणि मंदिरात हार, फुले, तुळशी माळ ,प्रसादाचे साहित्य घेऊन जाण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी  सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सामितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली,,,
येत्या चार दिवसात मागणी मान्य नाही केली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे ,संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष किरणराज घाडगे, कोळी महासंघाचे उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी,राष्ट्रवादी चे राज्य सचिव श्रीकांत शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश भांदुले, नगरसेवक मोहम्मद उस्ताद,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य संतोष सुळे ,नगरसेवक धनंजय कोताळकर ,शहर अध्यक्ष संतोष कवडे, नगरसेवक शिवाजी मस्के, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,अनिल सपताळ, प्रशांत डोके ,पिंटू माळी ,गणेश शिंदे ,दादा म्हेत्रे, रुपेश डोके ,गणेश मस्के, इत्यादी उपस्थित होते.