*प्रा. तुकाराम अनंतकवळस यांना पीएच.डी. पदवी प्रदान*

*प्रा. तुकाराम अनंतकवळस यांना पीएच.डी. पदवी प्रदान*


पंढरपूर -  रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा. तुकाराम विठोबा अनंतकवळस यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘सातारा जिल्ह्याच्या विशेष संदर्भाने महिला उद्योजकांचा अभ्यास’ या विषयावर सादर केलेल्या संशोधन प्रबंधास मान्यता देवून पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाल येथील प्रा.डॉ. सुधीर विनायक माने यांनी मार्गदर्शन केले.
 प्रा. तुकाराम अनंतकवळस यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्ये चेअरमन डॉ. अनिल पाटील, मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, सचिव प्रोफेसर डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्रोफेसर डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडीटर प्रोफेसर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी अभिनंदन केले. डॉ. अनंतकवळस यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक वर्गातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.