*जि.प.प्राथ.शाळा वाफळकरवस्ती शाळेचा विद्यार्थी कु.वेदांत बाळकृष्ण टेके राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोलापूर जिल्ह्रात प्रथम*
करकंब /प्रतिनिधी:-
येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचा विद्यार्थी कु.वेदांत बाळकृष्ण टेके हा हिंदू संस्कृती युट्यूब चँनल वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आँनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्या स्पर्धेचा निकाल आज लागला असून सर्वत्र कौतुक होत असुन वर्गशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे आई रेश्मा टेके.वडील बाळकृष्ण टेके यांच्या मार्गदर्शनाखाली ही यश प्राप्त केले असून गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,केंद्रप्रमुख कपीनंदन कांबळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक वसेकर,उपाध्यक्ष नितीन वसेकर मुख्याध्यापक किरण ढोबळे आजी आजोबा काका काकू सर्व पालक ग्रामस्थ यांनी कौतुक केले आणि स्पर्धात्मक परीक्षेतही घवघवीत यश मिळण्यासाठी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या*