*नारायण चिंचोली तंटामुक्त अध्यक्षपदी विजय कोळेकर तर उपाध्यक्षपदी महेश माने यांची निवड*

पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी विजय नागनाथ कोळेकर तर उपाध्यक्षपदी महेश उत्तम माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
नारायण चिंचोली ग्राम प्रशासनाच्या वतीने बुधवार 1 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मणराव धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, ग्रामसेवक संतोष गायकवाड, तलाठी बाळासाहेब अनुभुले, कृषी सहाय्यक अधिकारी शामराव माळी, पोलीस पाटील मोहन लवटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, विठ्ठल माने, नवनाथ कोले आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष, यांचा सत्कार लक्ष्मणराव धनवडे गहीनीनाथ चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर बरडे ,पोपट पाटील, जनार्दन कंदारे, सोसायटीचे व्हा. चेअरमन श्रीधर कोळेकर, संचालक शिवाजी वसेकर, बापूराव कोले, बळवंत धनवडे,प्रशांत नलवडे, धनाजी पासले ,आप्पासाहेब गुंड, भास्कर गुंड, नारायण गुंड बापूराव कोळेकर, भाऊसाहेब माने ,सुनील माने, मुकुंद घाडगे , ज्ञानेश्वर मस्के,अभिजीत कोले, ज्ञानेश्वर वाघमोडे, नितीन कोळेकर,अमोल हाडमोडे, बाळासाहेब बनसोडे, नितीन घाडगे, श्रीमंत कोळेकर ,दत्ता बनसोडे, अमोल गुंड, विकी वाघ ,बाळू वसेकर, दीपक गुंड आदी मान्यवर उपस्थित होते