*अमोल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात समर कॅम्प व अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ब्रिज कोर्स उत्साहात संपन्न.* 

*अमोल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात समर कॅम्प व अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ब्रिज कोर्स उत्साहात संपन्न.* 

.

करकंब/प्रतिनिधी
 अभिछाया प्रतिष्ठान संचलित,करकंब अमोल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात समर कॅम्प व अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ब्रिज कोर्स 2023 चे आयोजन केले होते.या समर कॅम्प व ब्रिज कोर्सचा आज समारोप करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सतीश देशमुख हे उपस्थित होते.
    या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प मध्ये पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अबॅकस,चित्रकला, नृत्यकला,वादन इत्यादीचे धडे देण्यात आले तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स आयोजित केला होता. सदर ब्रिज कोर्सचा हेतू हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनमध्ये विज्ञान शाखेबाबत जागृती निर्माण करणे तसेच त्यामध्ये असलेल्या संधीन बाबत माहिती देणे,त्यांच्या मनामध्ये इंग्रजी या विषयाविषयी असलेली भीती दूर करणे हा हेतू होता.सदर ब्रिज कोर्स हा दोन मे 2023 ते 20 मे 2023 या कालावधीमध्ये अभिछया शैक्षणिक संकुलामध्ये घेण्यात आला.
    कोर्से यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अमोल  शेळके, सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किसन सलगर, अमोल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजित पवार तसेच मार्गदर्शक शिक्षक म्हणून माने मॅडम, यादव मॅडम, माळी मॅडम,तांबोळी सर, कवडे सर, रेडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.